राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा प्रवक्तेपदी ॲड विशाल साखरे यांची नियुक्ती
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हा प्रवक्ते या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
हे नियुक्ती पत्र देताना खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी चे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर,आमदार विक्रम काळे, धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधार स्तंभ सुरेशदाजी बिराजदार,धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा अध्यक्ष महेंद्र धुरगुडे व इतर मान्य वरांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ॲड विशाल साखर यांच्या खांद्यावर जिल्हा प्रवक्ते या पदाची धुरा वरसोपवली आहे. जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार नाही. पक्षाचा आमदार नसला तरी धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे. पक्षाचा धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी विचार समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार तालुक्यातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार धाराशिव जिल्हयात राष्ट्रवादी काँगेस पार्टीच्या गावपातळीवर संघटनात्मक बांधणी करुन आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व आधिक बळकट करणार. नुतनजिल्हा प्रवक्ते ॲड विशाल साखरे यांनी तुळजापूरनामा न्युज शी बोलताना सांगितले.