आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते
प्रवीण उबाळे यांना मातृशोक
मुंबई, दि.४- नवी मुंबई सानपाडा येथील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते प्रवीण उबाळे यांच्या मातोश्री सरुबाई नामदेव उबाळे यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे संस्थापक सदस्य व समितीचे माजी अध्यक्ष आयु.प्रविण नामदेव उबाळे यांच्या मातोश्री सरुबाई नामदेव उबाळे यांच्यावर सानपाडा येथील एम. पी.सी.टी.हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते.३ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता निधन झाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती सानपाडा,पामबीच, सम्यक प्रतिष्ठान अंतर्गत बोधीवृक्ष विहार सानपाडा,राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय सानपाडा यांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रवीण उबाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे असून राज्यभरातील त्यांच्या मित्र परिवाराने श्रद्धांजली अर्पण केली.