राजा कंपनी तरुण मंडळ आयोजित शिबीरात १०८ दात्यानी केले रक्तदान
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूरच्या राजा श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती राजा कंपनी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 101 दात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली.राजा कपंनी गणेश मंडळाची स्थापना 1977 साली झाली असून राजा कंपनी तरुण मंडळाचे आधारस्तंभ सज्जनराव साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष
गणेश साळुंके यांच्या संकल्पनेतुन सार्वजनिक उपक्रम राबवत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
याप्रसंगी गणेश आरतीसाठी शहरातील उद्योजक दिनेश अग्रवाल, जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय साळूंखे, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्व्यक प्रशांत सोंजी, आबा कापसे, जिवन इंगळे,शिवानंद शिंदे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमास मंडळाचे ज्येष्ठ सभासद चंद्रकांत नेपते, मोहन साळुंके, तानाजी भोसले, चंद्रकांत साळुंके, सुभाष भोसले, विजय झाडपिडे, शिवाजी शिरसागर, गणेश ननवरे, सागर सुत्रावे, रंगा शिंदे, अभय साळुंके अभिजीत साळुंके दादासाहेब रोकडे मंडळाचे आधारस्तंभ सज्जनराव साळुंके यांच्या उपस्थितीमध्ये रक्तदान पार पडले.
मंडळाचे अध्यक्ष गणेश साळुंके,उपाध्यक्ष जयराज भोसले,राहुल भालेकर,कोषाध्यक्ष अमोल गरड, हरिष साळुंके,सचिव संकेत घोगरे,गणेश मस्के आदीसह मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.