भीक मागण्यासाठी दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण; तुळजापूरातून घेतले ताब्यात; पाच जण गजाआड
तुळजापूर : प्रतिनिधी
कात्रज भागातून दोन वर्षांच्या बालिकेचे अपहरण प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन वर्षांच्या बालिकेची आरोपीच्या तावडीतून तिर्थ क्षेत्र तुळजापूररातून सुखरुप सुटका केली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
सुनील सिताराम भोसले (वय ५१, रा. मोतीझारा), शंकर उजन्या पवार (वय ५०), गणेश बाबु पवार (वय ३५), शालुबाई प्रकाश काळे (वय ४५, तिघेही रा. डिकमाळ, ता. तुळजापुर, जि. धाराशिव) मंगल हरफुल काळे (वय १९, रा. खडकी रेल्वे लाईन झोपडपट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी न्यायालयाने २ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी
कात्रजमधील वंडरसिटी परिसरात एक वसाहत आहे. या वसाहतीतून शुक्रवारी (२५ जुलै) मध्यरात्री दोन वर्षांच्या बालिकेचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत तिच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बालिकेला घरातील पाळण्यात ठेवले होते. मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या दाम्पत्याचे लक्ष नसल्याची संधी साधून आरोपींनी तिचे अपहरण केले होते. दोन वर्षांच्या बालिकेचे अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता.
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे समाधान वाघमारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.. पुणे शहर वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व इतर समाज माध्यमांमध्ये सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात आहे. अशा उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलिसाचं नक्कीच कौतुक झालं पाहिजे .