तुळजापूर पालिकेचा उपक्रम;गणेशउत्सवा निमीत्त अनाथ मुलांना शालेय साहीत्य वाटप
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगर परिषद अधिकारी,कर्मचारी च्या वतीने गणेशउत्सवा निमीत्त नगर परिषद येथे श्रीं ची आरती तसेच अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला
प्रसंगी तुळजापूर शहरातील माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांच्या हस्ते श्रीं ची आरती करण्यात आली सर्व माजी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.अनाथ आश्रमातील मुलांना शालेय साहीत्य नगर परिषद अधिकारी,कर्मचारी यांच्या वतीने वाटप करण्यात आले. तसेच मा.नगरसेवक राहुल खपले यांच्या वतीने अनाथ आश्रमातील विद्यार्थी यांना स्कुल बँग देण्यात आल्या. नगर परिषद अधिकारी,कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.