तेरा लाखाचे मोबाईल चोरी प्रकरणी तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख येथील आरोपी २४ तासाच्या आत ताब्यात – सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्देरेड्डी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरात पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एस एस मोबाईल शॉपीच्या दुकानात प्रवेश करून छत फोडून १३ लाख ३३ हजार ५९१ रुपयाची आय फोन मोबाईल चोरी प्रकरणी तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख येथील एक आरोपी ताब्यात पोलिसांना तपास करण्यासाठी चार दिवसांसाठी कस्टडी (पोलीस कोठडी) मिळाली आहे.
तुळजापूर शहरातील पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शहरातील एस एस मोबाईल शॉपी या दुकानाची दि. १४ जुलै रोजी चोरट्यांनी आय फोन कंपनीचे मोबाईल चोरून नेल्याची मोबाईल शॉपी चे मालक सचिन शिंदे यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली होती.यासंदर्भात तुळजापूर पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मड्डेरेड्डी यांच्या टिमने यांनी 24 तासाच्या आत चोराच्या मुस्क्या आवळल्या चार दिवसांसाठी कस्टडी (पोलीस कोठडी) मिळाली आहे.