विठाई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम;गणेश उत्सवानिमित्त रक्तदान शिबिरात ३४ रक्तदात्यांचे रक्तदान
बाप्पाच्या दारी,आरोग्याची वारी…
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरात गणेश उत्सवानिमित्त विठाई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲड. आय.सी.यु.सेंटर च्या वतीने दिनांक ३ सप्टेंबर रोजी वेळ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रक्तदान शिबीराचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष आनंद कंदले,माजी नगराध्यक्ष पंडित जगदाळे,रोटरी क्लबचे अध्यक्ष लोखंडे,प्रशांत अपराधयांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष भोजने,डॉ. विनोद बर्वे,डॉ.श्रीराम नरवडे तसेच विठाई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲड. आय.सी.यु.सेंटर चा सर्व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या भव्य रक्तदान शिबिर उदंड प्रतिसाद देत ३४ जनांनी रक्तदान केले.
रक्तदान केल्यानंतर शरीरात पुन्हा रक्तनिर्मितीची प्रक्रिया सुरु होते. रक्तदानामुळे शरीरातील लोहाचं प्रमाण नियंत्रणात राहतं.शरीरातील लोहाचं प्रमाण वाढल्यास हृदय, यकृत, यासारख्या अवयवांना हानी पोहोचते.रक्तदानामुळे कॅलरीज बर्न होतात आणि वजन घटण्यास मदत होते.रक्तदान केल्यानं रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते.
डॉ. श्रीराम नरवडे, विठाई हॉस्पिटल
तुळजापूर
।