प्रभाग क्रं. ९ भागातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध – जनसेवक अमोल कुतवळ
तुळजापूर शहरातील प्रभाग क्रं. ९ परिसरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहून कायमस्वरूपी उपलब्ध असल्याले जनसेवक अमोल कुतवळ यांचा आज वाढदिवस
जनसेवक अमोल भैय्या कुतवळ यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने धाराशिव आणि कर्मभूमी तुळजापूर तालुक्यामधून खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सोशल मीडियावर मध्यरात्री १२ पासून सुरू झाले आहेत. आमच्या देखील त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा कारण एक चांगले राजकारणी एक राजकीय कार्यकर्ता व नेता अशी त्यांची ओळख राहिली आहे.
अनेक वर्ष काँग्रेसच्या विशेषता स्वः विलासराव देशमुख मुख्यमंत्री साहेब यांच्या खास जवळचे असलेले अमोल भैया कुतवळ यांचे वडील माधवराव कुतवळ तसेच अमोल भैया कोतवळ हे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अत्यंत जवळ राहून तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये अमोल कुतवळ यांनी आपले व्यक्तिगत स्थान निर्माण केलेले आहे.
ज्याला राजकारणाची जाण आहे त्यांना सर्व काही समजून जाईल आज ते समजून सांगण्याची वेळ नाही परंतु राजकारणामध्ये एखादा कार्यकर्ता काय करू शकतो हे अमोल कुतवळ यांनी या विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत दाखवून दिले. आज त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने ही आठवण करून देणे माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराचे काम आहे.शहराच्या राजकारणामध्ये देखील त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून आपले स्वतंत्र स्थान नगरपरिषदेच्या कामकाजामध्ये दाखवून दिलेले आहे. प्रस्थापित राजकारण आणि आपले राजकारण याच्यामध्ये अंतर ठेवून काम करणारा हा कार्यकर्ता सदैव सर्वांनाच हसतमुख दिसतो तेव्हा तो सर्वांनाच आपला वाटतो म्हणून अनेक तरुण कार्यकर्ते त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत आणि ते अत्यंत निष्ठेने त्यांच्यासोबत काम करत आहेत.
अत्यंत विश्वासू नेता म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली आहे.
✍️ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर