महाराष्ट्र विद्यालयाचे दहावी परीक्षेत यशाची परंपरा कायम
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
मार्च 2025 मध्ये झालेल्या इयत्ता दहावी बोर्डाच्या शालांत परीक्षेमध्ये महाराष्ट्र विद्यालय,तीर्थ (बु) ता.तुळजापूर. या शाळेने गेली 40 वर्षे दहावी शालांत बोर्ड परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण 95% टक्के निकाल लागला आहे.
त्यामध्ये प्रीती अंगद बोबडे या विद्यार्थिनीने 81% गुण घेत प्रथम क्रमांक मिळवला व श्रावणी सोबाजी सोमवंशी 79.20% घेऊन द्वितीय, तर मृणाल विजय लोहार 79% तृतीय क्रमांक मिळवला आहे.
तसेच माहेनूर आजम शेख या विद्यार्थिनीने इंग्रजी विषयांमध्ये 92 गुण घेऊन शाळेच्या इतिहासातील सर्वोच्च विक्रम केला आहे.ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी या विद्यालयात शिक्षण घेतात.
सामान्य गुणवत्ता प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना अलौकिक यशाकडे घेऊन जाण्यात शिक्षकांच्या कष्टाचा मोठा वाटा आहे.शाळा,संस्था आणि ग्रामस्थातून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या कष्टाचं आणि विद्यार्थ्यांच्या यशाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी मार्गदर्शक शिक्षक मुख्याध्यापक रवींद्र पाटील, तानाजी मेत्रे, जाधव काकासाहेब, दत्तू तावसे, जयवंत काशीद आदी शिक्षकांसह पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.