श्री तुळजाभवानी मंदिराच्या कळस,गाभारा मजबुतीकरणा संदर्भात ३० दिवसात अहवाल द्या – मंत्री आशिष शेलार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गळळी
श्री तुळजाभवानी मातेच्या
गाभाऱ्याच्या मजबुतीकरण धार्मिक परंपरा आणि श्रद्धेला बाधा न आणता उपाय शोधण्यावर शासनाचा भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिराच्या कळसाबाबत तसेच गाभाऱ्याच्या दुरुस्तीबाबत एएसआय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग तज्ज्ञांची, आय.आय.टी. तज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरले आहे. पुढील ३० दिवसांत अहवाल सादर करण्याच्या मंत्री आशिष शेलार यांची बैठकीत सुचना
कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा भक्कम आशीर्वाद पाठीशी आहे. आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादानेच मंदिर जीर्णोद्धाराचे अभुतपुर्व काम पूर्णत्वास जाणार आहे. त्यासाठी तुळजाभवानी देवीचे महंत, तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष, पुजारी बांधव उत्स्फूर्तपणे तयार आहेत.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत जीर्णोद्धारासाठी एकोप्याने काम करण्यावर शिक्कामोर्तब झाले.
आई तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने या निर्णयाचे सर्वांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
श्री तुळजाभवानी मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, आ. राणाजगजितसिंह पाटील, श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत तुकोजी बुवा गुरु बजाजी बुवा,मंदिर समितीचे व्यवस्थापक तथा तहसीलदार अरविंद बोळंगे,भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर-कदम, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो,पुजारी सचिन परमेश्वर- कदम, अनुप कदम, विशाल छत्रे ॲड. शिरीष कुलकर्णी, पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ.तेजस गर्गे, राज्य पुरातत्त्व विभागाचे अधिकारी,भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जितेंद्र आव्हाड यांच्यासह धाराशिवचे दोन्ही अर्धवटरावही तोंडघशी !
अर्धवट माहितीच्या आधारे नको ते मुद्दे उकरून भाविकांच्या भावनेशी खेळणाऱ्याना सणसणीत चपरक कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा जिर्णोद्धार सर्वांच्या सहमतीने निश्चित! सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीत महंत आणि तिन्ही पुजारी मंडळाने दिलेला दुजोरा धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि संस्कृती जपण्यासाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे.