शिवाजी सावंतांचा देवेंद्र फडणवीसांना गुलाब भेट ; दिलीप कोल्हेनी तर घोषणा पण केली
सोलापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोलापुरात मोठा धक्का बसणार असून मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अडीच ते पावणे तीन वर्षातच दिलीप कोल्हे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेत भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे.
तर माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या दौऱ्यात भेट घेऊन त्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. सध्या तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दोन दिवसात सावंत गटाची बैठक होणार असून त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रवेश तारीख निश्चित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
शिवाजी सावंत हे जिल्हाप्रमुख असताना त्यांना विश्वासात न घेता सोलापूर जिल्ह्यात मोठ्या नेत्यांचे प्रवेश झाले. पदे देतानाही विश्वासात न घेतल्याची नाराजी व्यक्त केली. लोकसभा संपर्क नेते महेश साठे यांच्या कार्यपद्धतीवर कोल्हे यांनी तर संताप व्यक्त केला होता.
यानंतर दिलीप कोल्हे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्कात दिसून आले. आता या प्रवेशात आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांचाच वाटा असणार का? असे ही बोलले जात आहे. दरम्यान सावंत सरांसोबत भाजपमध्ये कोण कोण जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिलीप कोल्हे यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया देताना त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.