धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी सरसकट हे. 50000/- रुपये अनुदान द्यावे. – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची मागणी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे सोयाबीन, उडीद, मूग व कांदा इ. इत्यादी खरीप पिकांचे संपूर्ण नुकसान झालेले आहे. सध्या प्रशासनाने त्याच्या पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु सध्याची परिस्थिती पाहता सर्व पिके पाण्यामध्ये आहेत. त्यामुळे शेतक-याचे 100 टक्के नुकसान झालेले आहे. यामधून शेतकऱ्याच्या हाती काहीही लागणार नाही. त्यामुळे शासनाने धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या नुकसानीपोटी सरसकट हेक्टरी 50 हजार आर्थिक मदत द्यावी. ही मदत मिळाली तरच शेतकरी जगेल. कारण खरीपासाठी खते, बियाणे,औषधे व मशागतीसाठीचा खर्च संपूर्ण वाया गेलेला आहे. त्यामुळे शेतकरी खूप मोठ्या आर्थिक संकटात आहे. शासनाने मदत केली तरच शेतकरी जगेल. रब्बी हंगामाचे नियोजन करू शकेल.
त्यामुळे शासनाने सर्व निकष बाजूला सारून शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी रुपये 50 हजार (दोन हेक्टर मर्यादेपर्यंत) मदत जाहीर करावी. अशी मागणी जिल्हाधिकारी धाराशिव यांचेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करीत आहे. दि.१९ ऑगस्ट रोजी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले. यावेळी पंचायत समिती माजी सभापती शिवाजी गायकवाड,बबन जाधव आदी उपस्थित होते.