अपसिंगा – तुळजापूर रस्त्याच्या स्थगित कामाला कोणाचा वरदहस्त….?

अपसिंगा – तुळजापूर रस्त्याच्या स्थगित कामाला कोणाचा वरदहस्त….?

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

सार्वजनिक बांधकाम विभाग तुळजापूर तुळजापूर ते अपसिंगा रखडलेल्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाला कोणीच मनावर घेत नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या प्रदीर्घ कालावधीपासून रखडलेल्या कामामुळे शेकडो वाहणे खिळखिळी झाली आहेत.
गेली दोन वर्षापासून अपसिंगा ते तुळजापूर रस्त्याचे डांबरीकरण काम सुरू आहे. गुत्तेदाराच्या मनमानी नुसार काम सुरू असून ठिकठिकाणी काम थांबविण्यात आल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गावाला गंभीर व कार्यक्षम पुढारी नसल्याने रस्ता पाणी असे प्रश्न वरचेवर गहन होत चालले आहेत. अनेक जणांना खराब रस्त्यामुळे पाठीचे, मणक्याचे आजार उद्भवत आहेत. या महत्वाच्या प्रश्नाकडे, खासदार, आमदार व गावपुढाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने लोकांतून चिड व्यक्त होत आहे.

अपसिंगा येथे भुरट्या पुढाऱ्यांची भाऊ गर्दी

अपसिंगा येथे भुरट्या पुढाऱ्यांची भाऊ गर्दी असलेल्या या गावाला वाली वारीस नसल्यासारखे निदर्शनास येत आहे कारण गावातील ज्वलंत प्रश्नाविषयी कोणताही गाव पुढारी (चंबु गबाळे) आवाज उठवत नसल्यामुळे आप आपसात मिली बघत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.कारण गावातील दैनंदिन महत्त्वाच्या प्रश्नाविषयी कोणालाही कसलेच सोयरे सुतक असल्याचे वाटत नाही.

तुळजापूर – अपसिंगा या ८ किमी अंतर असलेल्या डांबरीकरण रस्ता रखडला

तुळजापूर तालुक्यातील काटी परिसरात कामचालू आहे त्यामुळे मशीन तीकडे चालू आहे. दोन दिवसात तुळजापूर – अपसिंगा या ८ किमी अंतर रखडलेलेल्या डांबरीरस्ता कामाला चालू करणार आहेत.

विजय आवाळे, उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग तुळजापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!