मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
आत्महत्येस प्रवृत्तकेल्याने गुन्हा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरहुन पैसे घेवून ये म्हणून वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले.
शिला राजेंद्र वाघमारे,वय ३३ वर्षे,रा.तेरखेडा ता.वाशी.जि. धाराशिव यांनी दि.३० जुलै रोजी १२:३० वाजण्याच्या सुमारास तेरखेडा शिवारातील आरोपीचे शेतातील विहीरीतील पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली. आरोपी राजेंद्र कल्याण वाघमारे, रा.तेरखेडा.ता.वाशी जि. धाराशिव यांनी मागील सहा महिण्यापासुन घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरहुन पैसे घेवून ये या कारणावरुन मयत शिला हिस शारीरीक व मानसिक त्रास दिल्याने त्याचे त्रासास कंटाळुन मयत शिला यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादीवरून रवि आनंद कुसंगवाड, वय २९ वर्षे, रा. सरस्वती मंदीर खरपोडी रोड जालना ता.जि. जालना यांनी दि.२ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक भालेराव यांच्या आदेशाने येरमाळा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम-१०८,८०,८५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.