तालुक्यात शिवसेनेचा काँग्रेस व भाजपला मोठा धक्का :बोळेगावचे अंकुश रूपरूर व सिध्दाराम मुलगे यांचा शिवसेनेत प्रवेश
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणाच्या दिशेने मोठा टप्पा पार पडला असून, बोळेगाव येथील काँग्रेस पक्षाचे सक्रिय ग्रामपंचायत सदस्य अंकुश रूपरूर व भाजपचे सिध्दाराम मुलगे यांनी काँग्रेस व भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस व भाजपला तालुक्यातील ग्रामीण भागात मोठा धक्का बसला असून, शिवसेनेचा प्रभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे.
पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत अंकुश रूपरूर व सिध्दाराम मुलगे यांनी भगवा ध्वज हाती घेतला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धोरणे, जनतेसाठीचे कार्य व विचारधारा पाहून मी प्रेरित झालो आहे. ग्रामीण जनतेच्या हितासाठी मी शिवसेनेत सक्रिय काम करणार आहे.”पक्षाचे सचिव संजय मोरे, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,धाराशिव सह संपर्कप्रमुख भगवान देवकते,जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष प्रवेश सोहळा करण्यात आला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. सध्या तालुक्यात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी अमोल जाधव यांचे प्रयत्न सुरू असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीला नवे बळ मिळत असून, त्यांची कार्यगती दुपटीने वाढली आहे.पक्षप्रवेश प्रसंगी तुळजापूर शहर उपाध्यक्ष रमेश चिवचिवे, भुजंग मुकेरकर, युवा नेते शहाजी हाक्के यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा प्रवेश फक्त एका कार्यकर्त्याचा नसून, तालुक्यातील अनेक युवक व ग्रामस्थांच्या भावना शिवसेनेकडे वळत असल्याचे स्पष्ट संकेत या घटनेंतून मिळत आहेत. आगामी काळात शिवसेनेला तालुक्यात आणखी बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.