श्रावण मासानिमित्त प्रभाग चार मधील महिला भगिनींसाठी श्री अष्टविनायक दर्शन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
पवित्र श्रावण मासानिमित्त प्रभाग क्रमांक ४ मधील माता भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या श्री क्षेत्र तुळजापूर ते श्री अष्टविनायक दर्शन यात्रेला दि.३१ जुलै रोजी सकाळी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात सुरुवात झाली.या यात्रेला आई तुळजाभवानीच्या महाआरतीने शुभारंभ करण्यात आला. यात्रेत शेकडो माता भगिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या असून मार्गक्रमण करताना जयजयकाराने वातावरण भारावून गेले.
ही यात्रा जाणता राजा युवा मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. आधारस्तंभ अमोल भैय्या कुतवळ, अध्यक्ष सुदर्शन भैय्या वाघमारे, तसेच सहकारी अनमोल साळुंके, महेश (दादा) पुजारी, नागेश किवडे , राजाभाऊ चोपदार ,परीक्षित साळुंके, ॲड.शुभम खोले, सागर मस्के, महेश शिंदे, सोमनाथ मस्के, करण कदम, संकेत मस्के,आदित्य बुरांडे, दत्ता बेंद्रे, पांडुरंग माने, आंबेश्वर देशमुख, परिपूर्ण नियोजन करून माता भगिनींसाठी सुरक्षित व सोयीस्कर व्यवस्था केली आहे.यात्रेच्या शुभारंभ सोहळ्यास कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते भारत भाऊ कदम, धीरज भैया पाटील आणि शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी यात्रेतील माता भगिनींना शुभेच्छा देत ही यात्रा श्रद्धा आणि भक्ती वाढवणारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.यात्रेदरम्यान सर्वांना श्री अष्टविनायकांचे दर्शन घडवून प्रभागातील नागरिकांच्या आरोग्य, सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. या यात्रेद्वारे सामाजिक ऐक्य, बंधुभाव व भक्तिभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे.या उपक्रमाला प्रभागातील सर्व महिला आणि नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून प्रभागातील सामाजिक, धार्मिक वातावरण भक्तिभावाने भारले आहे.