अष्टविनायक दर्शनाला तुळजापुरातील 150 महिला रवाना – सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन वाघमारे यांचा उपक्रम.

अष्टविनायक दर्शनाला तुळजापुरातील 150 महिला रवाना – सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन वाघमारे यांचा उपक्रम.

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.सुदर्शन यशवंत वाघमारे हे नेहमी समाजकार्य करत असतात त्यांनी प्रभाग क्रमांक चार मधील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत तसेच गरजू लोकांच्या ही त्यांनी समस्या सोडवले आहेत. श्रावण महिन्या निमित्त तुळजापुरात प्रथमच एक आगळावेगळा उपक्रम म्हणून त्यांनी महिलांना अष्टविनायक दर्शन घडवून आणण्यासाठी त्यांनी आपल्या स्वखर्चाने प्रभागातील 150 महिला यांना 31 जुलै रोजी सायंकाळी परिवहन महामंडळाच्या तीन बस द्वारे अष्टविनायक दर्शना करिता रवाना केली आहे.या दर्शना मध्ये अष्टविनायक सोबत जेजुरी येथील खंडोबा दर्शन एक मुखी दत्त दर्शन तसेच पुणे येथील बालाजी दर्शन व देहू येथील संत तुकाराम महाराज समाधीचे दर्शन घडणार आहे. पहिला मुक्काम लेण्याद्री गणपती येथे तर दुसरा मुक्काम देहू येथे होणार आहे. हा प्रवास तीन दिवसाचा असून या मध्ये रोज दोन वेळेस जेवण एक वेळेस नाश्ता व दोन वेळेस चहा तसेच राहण्याची सोय सुद्धा त्यांनी केली आहे.या त्यांच्या उपक्रमामुळे गरजू महिलांना अष्टविनायक दर्शन घडवून येत आहे या त्यांच्या उपक्रमाचे शहरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!