मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोताचीवाडी शाळेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वयंवर मंगल कार्यालय धाराशिव येथे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्हा शिक्षक पुरस्कार, माझा वर्ग माझी जबाबदारी, उत्कृष्ट शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान जिल्हास्तर पुरस्कार वितरण कार्यक्रमात सन 2024 -25 वर्षात आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन स्पर्धेत तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोताचीवाडी ही शाळा जिल्ह्यात प्रथम आली .त्याबद्दल शाळेचा राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.प्रताप सरनाईक , जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिव कळंबचे आमदार कैलास दादा पाटील, उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी गुरुजी, जिल्ह्याचे कलेक्टर कीर्ती पुजार , सीईओ डॉ. मैनाक घोष, डायटचे प्राचार्य दयानंद जुटनुरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधा साळुंके, प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोकराव पाटील , अधिव्याख्याता सुचित्रा जाधव मॅडम, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी रंजना मैंदर्गी मॅडम , उपशिक्षणाधिकारी उद्धव सांगळे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी जंगम साहेब, तुळजापूर गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव साहेब यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला. हा सत्कार स्वीकारताना खोताचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक अशोक खडके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ शिंदे, सरपंच मोहिनी ताई क्षीरसागर, विस्ताराधिकारी तात्यासाहेब माळी, केंद्रप्रमुख तानाजी महाजन, केंद्रप्रमुख राजशेखर कट्टे, उपाध्यक्ष मनीषा सरडे, सहशिक्षिका श्रीमती मनीषा क्षीरसागर, युवा प्रशिक्षणार्थी ज्योती जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी आदर्श क्षीरसागर इत्यादीच्या उपस्थित हा पुरस्कार स्वीकारला.

पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी, प्रमाणपत्र ,अकरा लाख रुपयांचा चेक आणि पुष्पगुच्छ असे होते. एवढ्या मोठ्या स्वरूपाचे बक्षीस शाळेने मिळवल्याबद्दल सर्वत्र शाळेचे कौतुक करण्यात येत आहे . या कार्यक्रमास खोताचीवाडी गावातील नागरिक अक्षय शिंदे, सुखदेव पवार ,उमेश माने, शुभम सरडे ,ईश्वर डोलारे, शिवाजी सरडे, सतीश शिंदे, महादेव पवार, वंदना क्षीरसागर, उमा देडे हेही उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!