ट्रिपल महाराष्ट्र केसरी सहायक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब पटकवणारे आणि सध्या पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असणारे प्रसिद्ध कुस्तीपटू विजय चौधरी यांनी आज श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
जळगावचे सुपुत्र असणाऱ्या विजय चौधरी यांनी 2014 ते 2016 या कालावधीत सलग 3 वर्षे महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवला. त्यानंतर ते महाराष्ट्र पोलीस सेवेत सहायक आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. आई भवानीमातेचा आशीर्वाद प्रेरणा देतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दर्शनानंतर मंदिर संस्थान कडून त्यांचा देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष देवीचे पुजारी विशाल रोजकरी, विशाल गंगणे,मंदिर संस्थान चे जनसंपर्क अधिकारी गणेश निरवळ, दिनेश निकवाडे, अतुल भालेराव उपस्थित होते.