भगवान देवकते यांची शिवसेना सह-संपर्कप्रमुखपदी नियुक्ती
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आणि शिवसेनेची लढवय्यी परंपरा जपत, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार भगवान देवकते यांची धाराशिव जिल्ह्याच्या शिवसेना सह-संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्हा शिवसेना शिंदे गटाला ताकद देऊन पक्ष वाढवून येणाऱ्या सर्व निवडणुकीला सामोरे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद ग्रामपंचायत सोसायटी इतर सर्व निवडणुकीत शिंदे गटाचा विजयाचा विडा उचलला असून पक्ष वाढीस व कार्यकर्त्याला बळ देऊन जिल्ह्यात शिंदे गटाचे नावलौकिक करणार यावेळी नियुक्ती पत्रदेताना खासदार श्रीकांत शिंदे,पालकमंत्री प्रताप सरनाईक शिवसेना उपनेते ज्ञानराजजी चौगुले उपस्थित होते यावेळी जिल्हाप्रमुख मोहन पनोरे ,दत्ता अण्णा साळुंखे, सुरज महाराज साळुंखे आदि उपस्थित होते.