धाराशिव तालुक्यातील तोरंबा शिवारात जळालेला मृतदेह सापडला;पत्रकारांना घटनास्थळी येण्यास मज्जाव
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळा
धाराशिव तालुक्यातील तोरंबा शिवारात एका अनोळखी २३ वर्षीय युवक इसमाचा जळालेला मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले असून काही पोलीस कर्मचारी पत्रकारांना घटनास्थळी येण्यास मज्जाव करीत होते.
धाराशिव तालुक्यातील तोरंबा पाटी पासुन १ किमी अंतरावर पठाण लवण पुलाजवळ एका अनोळखी इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची माहिती तोरंबा गावचे पोलीस पाटील शाम पाटील यांनी बेबळी पोलीसांना खबर देताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल होऊन रितसर पंचनामा केला. यावरून प्रथमदर्शनी
मिळालेल्या माहितीवरून तोरंबा पाटीपासुन १ किमी अंतरावर पठाण लवणात ३ मे च्या वेळ पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान २३ वर्षाच्या युवकाला जीव मारुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गोणीच्या पोत्यात बांधून तोरंबा पाटी ते तोरंबा गावाकडे जाणाऱ्या रोड लगत एका खोल चारीत फेकून अंगावर पेट्रोल टाकून जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असुन सध्यातरी ओळख पटने मुश्किलीचे झाले आहे विचित्र जळालेल्या युवक इसमाची ओळख पटवणे पोलीसा समोर मोठे आव्हान आहे. या युवकाचा खुण अनैतिकत संबंधातून झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. मोक्याच्या घटनास्थळी बेबळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक महबूब शेख, माने, आर एम आडसुळ, रमेश कदम, अतुल मोरे, पोपट
जाधव, शिवशंकर साखरे, प्रकाश नरखेडकर, तोरंबा गावचे पोलीस पाटील शाम रामभाऊ पाटील आदी उपस्थित होते.