बोगस गुंठेवारी प्रकरणी सुरज कानडे यांना नोटीस; बोगस गुंठेवारी रद्द- न.प.मुख्याधिकारी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील सुरज बंडू कानडे यांची सर्वे नंबर २०७ /२ प्लॉट नं.२८ ची तुळजापूर नगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी तात्कालीन मुख्याधिकारी लक्षमण कुंभार यांच्या आदेशाची पायमल्ली करीत बोगस गुंठेवारी केले होती. शहरात जमिनीच्या खरेदी विक्री संदर्भात लागु असलेल्या व आवश्यक असलेल्या गुंठेवारीतच बनावट व बोगस कागदपत्राचा आधार घेत संबंधित अधिकारीच आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत बनावट गुंठेवारीच्या आधारावर खरेदीखत करुन देण्याची वाट मोकळी करून दिली असल्याचा प्रकार तुळजापूर नगरपालिकेत उघडकीस आला होता. मात्र नुतन मुख्याधिकारी अजिक्य रणदिवे यांनी तात्काळ सुरज बंडू कानडे यांची सर्वे नंबर २०७ /२ प्लॉट नं.२८ चा सात दिवसाच्या आत खुलासा द्यावा अन्यथा पुढील कारवाई करण्यात येईल अशी नोटीस काढण्यात आली होती.
अँड.अश्विनकुमार अरुणराव घोरपडे यांचा तक्रारी अर्ज आ.क्र ७२३३ यांच्या पाठपुराव्याला यश
उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय तुळजापूर यांनी गुंठेवारी मोजणी झालेली. दिसुन येत नाही.मोजणीसाठी साधा अर्ज सुद्धा भुमिअभिलेख कार्यालयाला प्राप्त झालेला दिसून येत नाही.नियम व अटींची पुर्तता होत नसल्याने सदर सर्वे क्र. २०७/२ भूखंड क्र. २८ चे गुंठेवारी अंतर्गत या कार्यालयाचे संदर्भ क्र.०१ अन्वये केलेले नियमितीकरण रद्द करण्यात येत आहे.
बोगस गुंठेवारी प्रकरणी श्रीमती मंगरूळे मॅडम यांना जिल्हाधिकारी निलंबनाची कारवाई करणार का ?
तुळजापूर नगर परिषद कार्यालय मार्फत श्रीमती मंगरूळे मॅडम यांच्या कार्यकाळात अशा बोगस गुंठेवारी कीती झाल्यात याची माहिती ॲड घोरपडे यांनी मागणी केली आहे.
आशा बोगस गुंठेवारी प्रकरणी संबंधित नगररचना सहाय्यक श्रीमती मंगरूळ मॅडम यांच्यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार ?
अँड.अश्विनकुमार अरुणराव घोरपडे, तुळजापूर