चेअरमन यांचे नाव सांगून तब्बल एक कोटी दहा लक्ष फसवणूक प्रकरणी;जिल्हा व सत्र न्यायालय धाराशिव यांच्याकडून जामीन मंजूर

चेअरमन यांचे नाव सांगून तब्बल एक कोटी दहा लक्ष फसवणूक प्रकरणी;जिल्हा व सत्र न्यायालय धाराशिव यांच्याकडून जामीन मंजूर

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

धाराशिव तालुक्यातील चोराखळी येथील सहकारी साखर कारखाना चोराखळी येथील चेअरमन यांचे नाव सांगून तब्बल एक कोटी दहा लक्ष रुपये व्हाट्सअप द्वारे चेअरमन असल्याचे भासवून फसवणूक केल्या प्रकरणातील आरोपीची जिल्हा व सत्र न्यायालय धाराशिव यांच्याकडून जामीन मंजूर

धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव सहकारी साखर कारखाना चोराखळी हा सद्यस्थितीत चोराखळी या गावाजवळ स्थित असून सदर साखर कारखान्याचे चेअरमन नामे अमर पाटील यांचे नाव सांगून व्हाट्सअप च्या माध्यमातून कारखान्याच्या कर्मचारी व फिर्यादी नामे बाळासाहेब कचरू वाडेकर यांच्या कडून मी कारखान्याचा चेअरमन  अमर पाटील असून मला एक कोटी दहा लाख रुपये तात्काळ आवश्यकता आहे अशा स्वरूपाचा मेसेज व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठवून सदर कारखान्याच्या खात्यावरून एक कोटी दहा लक्ष रुपये आरोपीच्या खात्यावर पाठवण्यास बनाव तयार करून सदरील एक कोटी दहा लक्ष रुपये फसवणूक झाले बाबत सदरील फिर्यादी यांनी पोलीस यंत्रणेला तक्रार देऊन सायबर पोलीस सेल यांच्यामार्फत गुन्हा रजिस्टर क्रमांक 08/2025 कलम : 66(c),66(D) IT Act, and 318 (4) BNS अन्वये नोंद झालेला होता. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी हा बाहेरील राज्यातील असून सदर प्रकरणात एक आरोपी यास पोलिसांनी सदरील फसवणुकी प्रकरणांमध्ये कट रचून मुख्य आरोपी सहकार्य केले बाबत असा आरोप ठेवून अटक केलेली होती सदर आरोपीने जिल्हा न्यायालयात त्याचा जामीन अर्ज ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांच्यामार्फत जामीन मिळणे करिता सादर केला होता. सदर सुनावणी दरम्यान ॲड. विशाल साखरे यांनी युक्तिवाद करत असताना पोलिसांनी जे काही कलम आरोपी वरती लावलेले आहे त्यामध्ये कट रचले बाबत हे कलमच त्याच्याविरुद्ध लावले गेलेले नाही तसेच सदर आरोपी हा केवळ मुख्य आरोपीस भेटला अथवा त्याच्याशी संपर्कात आला याबाबत या सद्य परिस्थितीत सक्षमपणे तो गुन्ह्यामध्ये समाविष्ट आहे किंवा नाही ही बाब जामीन अर्ज सुनावणी वेळेस ग्राह्यता येत नाही तसेच सदर आरोपी हा पोलिसांनी अटक करून त्याची संपूर्ण तपास व चौकशी करून आरोपी विरुद्ध जिल्हान्यायालयामध्ये दोषारोप पत्र देखील दाखल केलेले आहे त्यामुळे तपास यंत्रणेचा संपूर्ण तपास संपलेला असून आरोपी केवळ प्रकरणांमध्ये पुढील सुनावण्या होईपर्यंत तुरंगामध्ये ठेवणे म्हणजे तो आरोपी सिद्ध होण्याअगोदरच त्याला शिक्षा दिल्यासारखे होईल असा हजर बाबी युक्तिवाद जिल्हा न्यायालय समोर सादर करण्यात आला.

त्याचप्रमाणे न्यायालयामध्ये युक्तिवादा वेळेस हे देखील सांगण्यात आले की सदर आरोपी विरुद्ध पूर्वी कसल्याही प्रकारचा व कोणताही गुन्हा नोंद नसून आरोपीला या प्रकरणांमध्ये संशयाच्या आधारावर गोवण्यात आलेली आहे तसेच आरोपी हा न्यायालयाच्या अटी व शर्तीचे पालन करण्यास तयार असल्यामुळे त्यास जामिनावर सोडण्याची विनंती सादर करण्यात आली. तसेच सदरील युक्तिवादास समन्वयक असा पुष्टी देणारे उच्च न्यायालयाचे दाखले देखील युक्तिवादाच्या दरम्यान ॲड. विशाल साखरे यांनी सादर केले. सदरील युक्तिवाद व दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री ठुबे साहेब यांनी आरोपीची जामिनावर मुक्तता केली. सदर प्रकरणात ॲड. विशाल साखरे यांना ॲड. मंजुषा साखरे,ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अमित गोळे, ॲड. अर्चना कांबळे, ॲड.लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. उदय आडेकर, ॲड. संकेत गोरे, महेश पवार, रोहित लोमटे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!