तुळजापूर ड्रग्स प्रकरणी विनोद गंगणे यांना उच्च न्यायालय छत्रपती संभाजी नगर कडून जामीन मंजूर
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील सेवन गटातील आरोपी असलेले विनोद गंगणे यांना उच्च न्यायालय छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने जामीन मंजूर केला असून या प्रकरणात आतापर्यंत हा तिसरा जामीन मंजूर झाला आहे .
आतापर्यंत या प्रकरणात एकूण 38 संशयित आरोपी निष्पन्न झाले असून त्यामध्ये 22 जणांना अटक झाली आहे तर 14 जण अद्यापही फरार आहेत यामध्ये आलोक शिंदे व उदय शेटे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता यानंतर या प्रकरणात अटक असलेले सेवन गटातील संशयित आरोपी विनोद गंगणे यांना जामीन मंजूर झाला असून त्यामुळे त्यांच्या समर्थकात उत्साहाचे वातावरण पसरले आहे विनोद गंगणे हे तुळजापुरातील महत्त्वाचे राजकीय प्रस्थ असून त्यांच्या गोपनीय टीपद्वारेच पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला होता .
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने विनोद गंगणे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे त्यामुळे त्यांना जामीन मिळाल्याने आगामी काळात तुळजापुरात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे .