तुळजापूर जुन्याबस स्थानकाचे परिवहनमंत्र्याच्या हस्ते उद्घाटनाच्या नादात बोगस कामचा सपाटा सुरूच
जुन्या कंपाउंड वॉल वर बांधकाम,प्लास्टर बांधकामावर पाणी न मारताच लगेच कलर काम !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री क्षेत्र तुळजापूर येथील बहुचर्चीत असलेल्या बस स्थानकाचे उदघाटन करण्याच्या नादात गुत्तेदारांकडून वाल कंपाऊंडचे काम जुन्या बांधकामावर नवीन बांधकाम करून अखंड प्लास्टर करून सर्व काम पूर्ण केल्याचे दाखवून राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन करून मोकळे होण्याचा घाट ठेकेदार गुत्तेदारांच्या कडून थातुल मातूर काम करून उद्घाटनाचा सपाटा केला जात आहे.
दि.३० एप्रिल २०२५ रोजी राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हा दौऱ्यावर येत आहे यांच्या हस्ते बस स्थानकाच्या नुतनीकरण कामचे उदघाटन करण्यात येणार आहे. यामुळे गुत्तेदारांकडून जुन्या सुरक्षा भिंतीवर नवीन बांधकाम करून नियमानुसार सुरक्षा भिंत उभारण्यात आले असल्याचे दाखवून केलेल्या सुरक्षा भिंतीच्या कामाला वेळ आणि पाणी मारले नाही तरीही लगेच रंगरंगोटी केली जात आहे.
जुन्या कंपाउंड वॉल वर बांधकाम लगेच प्लास्टर बांधकामावर पाणी न मारताच लगेच कलर काम ! उद्दघाटनाचा नाहात जुन्या बसस्थानकाची राख रांगोळी