लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
बेंबळी पोलीस ठाणे हद्दीत एका गावातील २१ वर्षीय मुलगी (नाव- गावगोपनीय) दि.27.04.2025 रोजी 12.00वा. सु. हिस गावातील एका तरुणांनी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.28.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-69 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा
लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या १८ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, गावातील एका तरुणाने सन २०२२ ते २२ सप्टेंबर २०२३ दरम्यान तिला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्यासोबत बाहेर चल, नाहीतर तुझ्या भावाला मारून टाकीन’ अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने तिला बळजबरीने मोटरसायकलवर बसवून गावाजवळील झाडीत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास भावाला जीवे ठार मारण्याची धमकीही त्याने दिली. याप्रकरणी पीडितेने २८ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेचे कलम ३७६, ३७६ (२) (एन), ५०६ तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याचे कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, २८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गावातील तीन तरुणांनी तिचा आणि तिच्या मुलीचा वाईट हेतूने हात धरून झोंबाझोंबी केली. त्यातील एका तरुणाने, ‘तुझ्या मुलीचे लग्न माझ्या भावासोबत का लावून देत नाहीस?’ असे म्हणून पीडित महिलेला घराच्या बाजूला अंधारात ओढत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच, घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या २८ एप्रिल २०२५ रोजीच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेचे कलम ३७६, ३७६ (२) (एन), ५०६ तसेच पोक्सो कायद्याचे कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.