तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली !
सलगरा मंडळ अधिकाऱ्याचा मनमानी कारभार..
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील सलगरा महसूल मंडळअंतर्गत असलेले मंडळ अधिकारी यांना कलम ८५ नुसार दिलेला तसिलदार यांचा आदेश आसून सुद्धा संबंधित मंडळाधिकारी दुर्लक्षित किंवा नाकारला जात आहे.
कायदेशीररित्या परिपूर्ण कागदपत्रे फेरमंजूर साठी दिल्या नंतर ही फेरमंजूरीसाठी मंडळ फेरमंजूर करण्यात तयार नाहीत
तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख तसेच किल्लेज येथील शेतकरी सुरेश किसन सारणे यांनी अर्ज व अर्जासोबत मा. तहसीलदार तहसील कार्यालय तुळजापूर यांचे आदेश जा.क्र. २०२४/ महसूल कलम ८५ कावी- १४४९ दि. २४/०३/२०२५ प्रमाणे आदेश आसताना देखील मंडळ अधिकारी जाणून बुजून फेरमंजूर करत नाहीत.तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याकारणाने मंडळ अधिकाऱ्यांना नोटीस काढून योग्य ते कार्यवाही करावी आणि प्रलंबित असलेले फेरमंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी तालुक्यातील शेतकऱ्यांतून चर्चा होत आहे.