भाविकांसाठी तुळजापूरमध्ये ;नवरात्र महोत्सवासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर पार्किंगची मागणी !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
येत्या २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी तुळजापूरमध्ये पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक रणजीत इंगळे, आनंद मालक, जगताप, श्रीकांत रसाळ, गणेश अणदूरकर आणि गणेश इंगळे यांनी दि. १५ सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी, नगरपरिषद कार्यालय तुळजापूर तसेच पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे तुळजापूर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, २२ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या काळात जवाहर चौक, कमान वेस आणि आर्य चौक या भागात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाना येथूनही प्रचंड संख्येने भाविक येणार आहेत.
याप्रसंगी, जगदाळे कॉम्प्लेक्स व उद्धवराव सभागृह येथे पार्किंगची सोय करण्यात यावी, जेणेकरून भाविक पारंपरिक पुजाऱ्यांपर्यंत सहज पोहोचू शकतील, असे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.