तुळजापूर;शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ शहर प्रवेश पाससंदर्भात महत्त्वाच्या सूचना
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री क्षेत्र तुळजापूर येथे येत्या २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना आवश्यक सेवा सुरळीत पोहोचाव्यात यासाठी शहर प्रवेश पासची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश देशमुख व पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी सविस्तर सूचना जाहीर केल्या आहेत.
🟢 २४ तास प्रवेशासाठी परवानगी असलेले वाहन प्रकार
रुग्णवाहिका,वैद्यकीय सेवा व मेडिकेल साहित्य वाहने,पिण्याच्या पाण्याची वाहतूक करणारी वाहने हे सर्व वाहनांना शहरातील सर्व पॉकींग पॉईन्टवरून २४ तास प्रवेश दिला जाणार आहे.
🟢 दूध,भाजीपाला व पेपर वाहतूक करणारी वाहने
मोटारसायकल / हातगाडी → सकाळी ५ ते ९ व संध्याकाळी ५ ते ९ (सर्व पॉकींग पॉईन्ट)
टेम्पो / छोटा हत्ती / टमटम / ट्रक → सकाळी ५ ते ९ व संध्याकाळी ५ ते ९ (फक्त लातूर रोड)
🟢 शेतीमाल बाजार समिती
सकाळी १० ते दुपारी ४ (लातूर रोड)
🟢 गॅस सिलिंडर वाहतूक
दुपारी १२ ते ४ (लातूर रोड)
🟢 किराणा व दुकान साहित्य वाहतूक (ट्रक, टेम्पो व इतर) रात्री १० ते पहाटे ४ (लातूर रोड)
दरम्यान, पात्र नागरिकांनी प्रवेश पास मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह डीवायएसपी कार्यालय, तुळजापूर येथे सकाळी १० ते दुपारी २ व सायंकाळी ३ ते ७ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
शहरात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तसेच भाविकांच्या सोयीसाठी ही व्यवस्था करण्यात आली असून नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश देशमुख व पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी केले आहे.