मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांना ‘मराठवाडा गव्हर्नन्स अवॉर्ड’ सन्मान
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नगर परिषद तुळजापूर येथील मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांना “मराठवाडा गव्हर्नन्स अवॉर्ड” हा नामांकित सन्मान. दैनिक नवभारत व नवराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “मराठवाडा आयकॉन सन्मान सोहळा-२०२५” मध्ये हा मानाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
हा भव्य सोहळा रविवारी दि.१४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४५ वाजता प्रारंभ झाला लातूर येथील हॉटेल वैष्णव येथे पार पडला मराठवाडा विभागातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करून समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या मान्यवरांचा या प्रसंगी गौरव करण्यात आला. सामाजिक जाणीव, प्रेरणा आणि गौरव यांचा संगम घडवणारा हा सन्मान सोहळा राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील,
औशा मतदार संघाचे आ. अभिमन्यू पवार,नवभारत व नवराष्ट्र चे ग्रुप प्रेसिडेंट ए. श्रीनिवास,कार्यकारी संपादक संजय मलमे, मराठवाड्याचे सरव्यवस्थापक कल्याण पांडे, लातूर-बीड,धाराशिवचे आवृत्ती प्रमुख जयप्रकाश दगडे तसेच मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यातील नगर परिषद व नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांचा विशेष सन्मानही यावेळी करण्यात आला. तुळजापूरसारख्या धार्मिक आणि ऐतिहासिक नगराची प्रशासनिक जबाबदारी पार पाडताना मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी दाखवलेली कार्यक्षमता व नाविन्यपूर्ण उपक्रम यांची दखल घेत हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
या सन्मानामुळे तुळजापूर नगरपरिषद तसेच तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. सामाजिक विकास आणि सुशासनाची दिशा दाखवणारा हा पुरस्कार रणदिवे यांच्या पुढील कार्याला नक्कीच बळ देणारा ठरेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.