माजी मंत्री सुनील तटकरे यांनी सहकुटुंबानी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
राज्याचे माजी जलसंपदा मंत्री व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दि.१७ एप्रिल रोजी सकाळी सहकुटुंब कुलस्वामिनी श्री. तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. तटकरे कुटुंबीयांनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन देवींची ओटी भरत कुलधर्म कुलाचार केले. यावेळी तटकरे कुटुंबीयांनी देवींची आरती केली.
खासदार सुनील तटकरे हे कुटुंबीयांसह खास हेलिकॉप्टरने श्री. तुळजाभवानी देवींच्या दर्शनाकरिता आले होते.
मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे यांनी श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र भेट देऊन सुनील तटकरे यांचा सत्कार केला. आमदार अनिकेत तटकरे यांचाही मंदिर संस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरधुडे,तुळजापूर तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी , महेश चोपदार, गोकुळ शिंदे तसेचे मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जाधव, गणेश निर्वळ, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, दीपक शेळके व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.