तुळजापूर पोलीस निरीक्षक पदाचा आण्णासाहेब मांजरे यांनी स्वीकारला पदभार
शिंदे शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांची आनंद नगर पोलीस स्टेशन येथे बदली झाली आहे. त्यानंतर आनंद नगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी तुळजापूर पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला.
दि.२३ फेब्रुवारी रोजी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख बापूसाहेब भोसले यांनी तुळजापूर पोलिस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांचे स्वागत सत्कार केला त्यावेळी विठ्ठल केवडकर व मोहनराव भोसले संजय गायकवाड संभाजी नेपते अमोल जाधव यावेळी शिवसैनिक उपस्थित होते.
तिर्थ क्षेत्र तुळजापूर मध्ये
तथाकथित तुळजापूर ड्रग्ज कार्टेल प्रकरण सद्ध्या राज्यभर चर्चेत असुन सदर प्रकरणात
होणाऱ्या गुन्ह्यांचा सखोल तपास, चोरी, चक्री,अवैध धंदे यावर नियंत्रण आणण्याचे नवीन पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्यासमोर आव्हान असणार आहे.