पोलिस निरीक्षकांची खांदेपालट,आनंदनगरचे तुळजापूला तर तुळजापूरचे आनंदनगर पोलिस ठाणे येथे जिल्हांतर्गत बदली
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांची तडकाफडकी जिल्हांतर्गत बदली करण्यात आली आहे.तिर्थ क्षेत्र तुळजापूर मध्ये तथाकथित तुळजापूर ड्रग्स कार्टेल प्रकरण सद्ध्या राज्यभर चर्चेत असुन सदर प्रकरणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तर पोलीसांना ७२ तासांचा अल्टीमेटम दिला होता.मात्र तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तर पोलिसांची बाजू घेत षटकार मारला तुळजापूर येथील ड्रग्स कार्टेल प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश देशमुख वेटिंग वर तर पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांची आनंद नगर धाराशिव येथे बदली तर तुळजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव हे येरमाळा पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे.धाराशिव येथील आनंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांची बदली तुळजापूर येथे करण्यात आले आहे.धाराशीचे पालकमंत्री धाराशिव दौऱ्या दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती.येत्या काही दिवसात फेरबदल करण्याचे संकेतही त्यांनी दिले होते.
जिल्हांतर्गत बदल्या
1. पोनि विनोद हनमंतराव इज्ञ्जपवार – परंडा पोलिस ठाण्यातून स्थानीय गुन्हे शाखा, धाराशिव येथे बदली.
2. पोनि अजित तुकाराम चिंतले – लोहारा पोलिस ठाण्यातून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग, धाराशिव येथे नेमणूक.
3. पोनि सचिन चंद्रकांत यादव – सायबर पोलिस ठाणे, धाराशिव येथून नळदुर्ग पोलिस ठाण्यात बदली.
4. सपोनि ज्ञानेश्वर भिमराज कुकलारे -धाराशिव शहर पोलिस ठाण्यातून लोहारा पोलिस ठाण्यात नियुक्त.
5. सपोनि तात्या रुपाजी भालेराव – तुळजापूर पोलिस ठाण्यातून येरमाळा पोलिस ठाण्यात बदली.
6. पोनि आण्णासाहेब रामचंद्र मांजरे आनंदनगर पोलिस ठाण्यातून तुळजापूर पोलिस ठाण्यात स्थानांतरित.
7. पोनि रविंद्र पांडुरंग खांडेकर – तुळजापूर पोलिस ठाण्यातून आनंदनगर पोलिस ठाण्यात नियुक्ती.