तुळजापूर ड्रग्स कार्टेल प्रकरणी कुरघोडीचे राजकारण.

तुळजापूर ड्रग्स कार्टेल प्रकरणी कुरघोडीचे राजकारण.

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तिर्थ क्षेत्र तुळजापूर मध्ये
तथाकथित तुळजापूर ड्रग्स कार्टेल प्रकरण सद्ध्या राज्यभर चर्चेत असुन सदर प्रकरणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तर पोलीसांना ७२ तासांचा अल्टीमेटम देत ड्रग्स प्रकरणी विस्तृत लेखी माहिती मागवली होती परंतु आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दि.२१ फेब्रुवारी ड्रग्ज प्रकरणात डीवायएसपीने पुजारी मंडळाच्या अध्यक्ष विपीन शिंदे यांना धमकी दिल्या प्रकरणी तुळजापूर तहसिल कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला भेट देवून
त्यांची भुमीका मांडताना म्हणाले की सदर ड्रग्स प्रकरणी शहरवासीयांचे निनावी तक्रारीची दखल डिसेंबर महिन्यातच घेऊन पोलीसांनी वेगवान तपासास सुरुवात केली होती परंतु ड्रग्स तस्कर दरवेळेस हुलकावणी देत होते परंतु पोलीसांनी तस्करांवर गुप्त पाळत ठेवत तामलवाडी हद्दीत आरोपी मुद्देमालासह पकडले व आता पोलीसांनी जलद तपास करून तपास थेट मुंबई येथील ड्रग्स पेडलर पर्यंत पोहचवीला असुन याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नसुन जे कोणी या ड्रग्स प्रकरणाशी संबंधित असतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे शहरवासीयांना अश्वस्थ केले.

सदर ड्रग्स कार्टेल प्रकरणी तुळजापूर शहरातील वातावरण ढवळून निघाले असुन या ड्रग्स प्रकरणात राजकारण होत असल्याचा संशय नागरीक उघडपणे व्यक्त करत आहेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक हे ड्रग्स प्रकरणी पोलीसांच्या कार्यपद्धतीवर नाराज असुन पोलीसांवर कारवाई करण्याच्या बेतात असुन तसे त्यांनी इनकॅमेरा बोलुन दाखवले, परंतु याऊलट आमदार राणाजगजितसिंह पाटील हे मात्र पोलीस तपासावर समाधानी असुन पोलीस सर्व प्रकरणाचा लवकर छडा लावतील अशी आशा बाळगुन आहेत परंतु शहरवासीयांच्या मते गत २ वर्षांपासून शहरात ड्रग्स विक्री जोमात चालु होती त्यावेळी शहरातील कोणीही ड्रग्स प्रकरणी साधी वाच्यता केली नाही परंतु आता जवळच आलेल्या तुळजापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शहरातील काही समाजसेवक राजकीय फायदा उठवीण्यासाठी ड्रग्स प्रकरणी राजकारण करीत असल्याची चर्चा नागरीक करत आहेत एकंदर पालकमंत्री पोलीसांवर कारवाई च्या भुमीकेत आमदार तपासावर समाधानी तर जनतेला या ड्रग्स प्रकरणी राजकारण होण्याची चिंता आहे एकंदर तुळजापूर ड्रग्स कार्टेल प्रकरणी राजकीय तमाशाचा फड रंगला असुन आता कोणते वगनाट्य किंवा एकपात्री प्रयोग शहरवासीयांना बघायला मिळणार ते येणारा काळच ठरवेल!

तुळजापूर ड्रग्स कार्टेल प्रकरण

एमडी ड्रग्स कार्टेल प्रकरणी दि.२४ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी यांना उपोषणाचा इशारा दिला होता. व ड्रग्ज कार्टेल हे माजी न.प.सदस्य चालवीत आहेत व त्यांचे पोलिस प्रशासनात गुडवील आहे. असे लेखी निवेदन दिलेले होते.

रविंद्र साळुंके,
छावा संघटना,तालुकाध्यक्ष तुळजापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!