ड्रग्ज प्रकरणात डीवायएसपीने पुजारी मंडळाच्या अध्यक्षांना दिली धमकी;तुळजापूर तहसिल कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण .
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपोषणास भेट देवून डीवायएसपी यांच्या सोबत बैठक घेणार म्हटले
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळा
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रग्ज प्रकरणातील तक्रार केल्याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांनी तक्रारदारास धमकावल्याप्रकरणी तुळजाभवानी पुजारी मंडळाकडून तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण शुक्रवारी दि 21 रोजी करण्यात आले उपोषणास तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन करताना म्हणाले कि खासकरून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे . ह्यात कोणाची ही गैय केली जाणार नाही . मग जवळचा असो किंवा डिपारमेंट मधला असो म्हणाले
याबाबत अधिक माहिती अशी की सध्या तिर्थक्षेत्र तुळजापूर येथे ड्रग्ज प्रकरण सुरू आहे पालकमंत्री तुळजापूर येथे आले असता पुजार्यांंनी याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे सांगितले दरम्यान याबाबत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 72 तासाच्या आत अहवाल देण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत मात्र यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांनी पुजारी मंडळाच्या अध्यक्ष विपीन शिंदे यांना तुम्ही खोटी माहिती देत आहात आणि मी तुमच्यावर कारवाई करीन अशी प्रत्यक्ष धमकी दिली दरम्यान एखाद्या नियमबाह्य गोष्टीची तक्रार केल्यास तक्रारदाराचे खच्चीकरण सुरू असून पोलीस तक्रारदाचे म्हणणे ऐकून न घेता आरोपींना पाठीशी घालत असल्याचे पुजारी मंडळांने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सदर प्रकार हा तुळजाभवानी मंदिर कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये चित्रित झालेला असून अशा प्रकारे न्याय मागणार्यावरतीच जर कारवाई करण्याचे प्रयत्न होत असतील व असे प्रकार पुढे होऊ नये यासाठी या घटनेचा निषेध करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण करण्यात आले आहे तसेच शहरात सध्या चोरांचे प्रमाण वाढत असून तुळजापूर येथे दररोज लाखो भाविक देवी दर्शनासाठी येत असतात त्यामुळे शहरातील अवैध धंदे गुंडागर्दी आणि होणाऱ्या चोर्याचा पोलीस प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करून तुळजापूर शहर भयमुक्त करण्याची मागणी देखील आमदार राणा दादा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे दरम्यान सदर प्रकरणात ड्रग्जमाफिया व त्यांच्या गुंडाकडून खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे तसेच प्राणघातक हल्ले देखील होण्याची शक्यता असल्याने याबाबत पोलीस प्रशासनाने दक्षता घेण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे या निवेदनाची प्रत पालकमंत्री जिल्हाधिकारी आमदार व नायब तहसीलदार संतोष पाटील यांना देण्यात आली आहे . यावेळी पुजारी तसेचे सर्व पक्षाचे नेते आणि शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.