बीज विषय “शाश्वत ग्रामीण विकासाची पुनर्रकल्पनाः वाटचाल आणि आव्हाने”
तुळजापूर : प्रतिनिधी
टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS) तुळजापूर कॅम्पस दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय ‘ग्रामोदय’ परिषद आयोजित करण्यात आली आहे. दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी परिषदेच्या उदघाटन प्रसंगी, मा.ना.जयकुमारजी गोरे, ग्रामीण विकास व पंचायतीराज मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. पोपटराव पवार, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य आदर्श गाव कार्यक्रम तथा सरपंच, हिवरे बाजार मा. गजानन डांगे, ग्रामीण आणि आदिवासी विकास तज्ञ, त्याचबरोबर मा. जिल्हाधिकारी, धाराशिव, डॉ. मैनाक घोष,सी.ई.ओ. जि.प. धाराशिव, प्रो. शंकर दास, प्र-कुलपती, श्री. नरेंद्र मिश्रा, कुलसचिव, TISS, मुंबई, प्रो. बाळ राक्षसे, कॅम्पस संचालक, TISS, तुळजापूर व डॉ हिना खातुन आणि ग्रामीण विकासात कार्यरत असलेले देशभरातील नामवंत तज्ञ, संशोधक, प्राध्यापक, विध्यार्थी, सरपंच, महिला बचत गट, शेतकरी कंपनी प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. तसेच, दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी समारोपीय कार्यक्रमासाठी मा. ना. प्रताप सरनाईक (परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, धाराशिव) , आमदार राणाजगजितसिंह पाटील उपस्थित राहणार आहेत. दि.२१ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषद मध्ये प्रो. बाळ राक्षसे बोलत होते.
या परिषदेचा बीज विषय “शाश्वत ग्रामीण विकासाची पुनर्रकल्पनाः वाटचाल आणि आव्हाने” असा आहे. याच बरोबर या बीज विषयाच्या अनुषंगाने,
१. ग्रामीण संस्थांचे बळकटीकरण आणि शासकीय धोरण २. ग्रामीण भागातील शिक्षण ३. ग्रामीण भांगातील आरोग्य ४. ग्रामीण भागातील पाणी संकट आणि उपाय योजना ५. ग्रामीण उद्योजकता ६. अर्थ पुरवठा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ७. पर्यावरणीय शाश्वतता, शेती आणि उपजीविका या विषयांवर देशभरातील तज्ञ, संशोधक, प्राध्यापक आणि विध्यार्थी आपले शोध निबंध सादरीकरण करनार आहेत व तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करनार आहेत
ही राष्ट्रीय ‘ग्रामोदय’ परिषद विकसित ग्राम, विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारतासाठी प्रेरणादायी आणि महत्वपूर्ण आहे.