ड्रग्ज प्रकरणात डीवायएसपीने दिली धमकी;तुळजापूर येथे लाक्षणिक उपोषण ..

ड्रग्ज प्रकरणात डीवायएसपीने दिली धमकी;तुळजापूर येथे लाक्षणिक उपोषण !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळा

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रग्ज प्रकरणातील तक्रार केल्याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांनी तक्रारदारास धमकावल्याप्रकरणी तुळजाभवानी पुजारी मंडळाकडून तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण शुक्रवारी दि 21 रोजी करण्यात येणार आहे

याबाबत अधिक माहिती अशी की सध्या तिर्थक्षेत्र तुळजापूर येथे प्रकरण सुरू आहे पालकमंत्री तुळजापूर येथे आले असता पुजार्यांंनी याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे सांगितले दरम्यान याबाबत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 72 तासाच्या आत अहवाल देण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत मात्र यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांनी पुजारी मंडळाच्या अध्यक्ष विपीन शिंदे यांना तुम्ही खोटी माहिती देत आहात आणि मी तुमच्यावर कारवाई करीन अशी प्रत्यक्ष धमकी दिली दरम्यान एखाद्या नियमबाह्य गोष्टीची तक्रार केल्यास तक्रारदाराचे खच्चीकरण सुरू असून पोलीस तक्रारदाचे म्हणणे ऐकून न घेता आरोपींना पाठीशी घालत असल्याचे पुजारी मंडळांने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सदर प्रकार हा तुळजाभवानी मंदिर कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये चित्रित झालेला असून अशा प्रकारे न्याय मागणार्यावरतीच जर कारवाई करण्याचे प्रयत्न होत असतील व असे प्रकार पुढे होऊ नये यासाठी या घटनेचा निषेध करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार आहेत तसेच शहरात सध्या चोरांचे प्रमाण वाढत असून तुळजापूर येथे दररोज लाखो भाविक देवी दर्शनासाठी येत असतात त्यामुळे शहरातील अवैध धंदे गुंडागर्दी आणि होणाऱ्या चोर्याचा पोलीस प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करून तुळजापूर शहर भयमुक्त करण्याची मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे दरम्यान सदर प्रकरणात ड्रग्जमाफिया व त्यांच्या गुंडाकडून खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे तसेच प्राणघातक हल्ले देखील होण्याची शक्यता असल्याने याबाबत पोलीस प्रशासनाने दक्षता घेण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे या निवेदनाची प्रत पालकमंत्री जिल्हाधिकारी आमदार व तहसीलदार यांना देण्यात आली आहे ……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!