पोलीस अधीक्षक यांना ७२ तासांचा अल्टीमेट – पालकमंत्री मा.प्रताप सरनाईक
तुळजापूरचे ड्रग्स प्रकरण मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल –
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.प्रतापराव सरनाईक यांनी तुळजापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीसांना चिमटे काढत पोलीस अधीक्षक यांना ७२ तासांचा अल्टीमेट दिला व पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले की ड्रग्स कार्टेल चा प्रकार अत्यंत गंभीर असुन त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे यावेळी बोलताना त्यांनी थेट पोलीस अधीक्षक यांना सदर ड्रग्स विषयी ७२ तासात लेखी माहीती सादर करा कारण तुळजापूरचे ड्रग्स प्रकरण मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मनावर घेतले असुन मला पालकमंत्री या नात्याने बेधडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे म्हटले व सदर ड्रग्स प्रकरणातील तपासात कोणी कितीही मोठा राजकारणी असो किंवा कोणी कितीही मोठा पोलीस अधीकारी असो परंतु कारवाई मात्र नक्की होणार असे आश्वासन पालकमंत्र्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिले असुन तुळजापूर येथील ड्रग्स कार्टेल प्रकरणी ७२ तासांत लिखीत माहीती पोलीस अधीक्षक यांनी न दिल्यास जबाबदार तुळजापूर पोलीसांवर कारवाई करु असा इशारा पोलीस अधीक्षक यांना दिला असुन तात्काळ सवीस्तर माहीती लिखीत स्वरुपात द्या व योग्य तो तपास करुन दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश मा. पालकमंत्र्यांनी आजच्या पत्रकार परिषेदेत दिले आहेत परंतु येत्या काळात या ड्रग्स प्रकरणी काय भुमीका तुळजापूर पोलीस घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे….
पालकमंत्र्यांनी दिली पोलीसांना तंबी !
तुळजापूर ड्रग्स कार्टेलचा पर्दाफाश होणार का ??
पालकमंत्र्यांची मिडीयासमोर पोलीसांना तंबी लिखीत माहीती द्या अन्यथा निलंबनास तयार रहा….