तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी पोलीस निरीक्षक आणि डीवायएसपीच्या निलंबनाची शहरवासीयांनी पालकमंत्र्याकडे केली मागणी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्रीक्षेत्र तुळजापूर येथील चोरी, अवैध धंदे व नुकताच मिळून आलेल्या ड्रग या आमली पदार्थाबाबत.पत्रकार परिषद मध्ये तुळजापूर शहरवासिय नागरीक , पुजारी वर्गाच्यावतीने मा. प्रतापजी सरनाईक पालकमंत्री, जिल्हा धाराशिवः निवेदन सादर केले.तुळजापूर शहरातील नागरीक व श्री देवीभक्त निवेदन दिले की, तुळजापूर शहरात गेली दोन वर्षापासून पोलीसांचा कसलाही धाक राहीलेला नसुन वेळोवेळी चोरी, लुट, दरोडे, फसवणूक, वेश्या व्यवसाय, आमली पदार्थ (ड्रग), जुगार अशा अवैध धंदयाना प्रचंड उत आला आहे. नागरीक व भक्त यामुळे अतिशय त्रस्त व भयभित झालेले आहेत.
वेळोवेळी तक्रारी व असे व्यवसाय करणारे लोकांची नावे निष्पन्न झाली असतानाही कांहीही कारवाई केली जात नाही, असे गुन्हे कमी होण्याऐवजी गुन्हयात प्रचंड वाढ होत असलेली दिसुन येत आहे. यामुळे गुन्हेगार आणि पोलीस यांचेच लागेबांधे आहेत हे निष्पन्न होते.महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या व देशभरातुन भाविक श्रध्देने तुळजापुरी येतात. त्यांना चोरीचा व अव्यवस्थेचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे हे तिर्थक्षेत्र नावारुपास येण्या ऐवजी संपुर्ण महाराष्ट्रात अतिशय बदनाम होत आहे.नुकतेच गेली 2/3 दिवसापुर्वी ड्रग्ज आमली पदार्थ शहरात येत असताना तामलवाडी पोलीसांनी कारवाई करुन ड्रग व आरोपी मुद्देमालासह पकडले आहेत. आज रोजी तुळजापूरात ड्रग विकणारे 20/25 तर यांचे अधीन 1500/2000 तरुण झालेले असुन त्यांचे भविष्य अंधारात आहे. वेळोवेळी डी.वाय.एस.पी. निलेश देशमुख व पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांना गुन्हेगाराची नावानिशी यादी ड्रग घेत असलेले व्हीडीओ देवुनही जाणीवपूर्वक सदरील अधिकाऱ्याकडुन दुर्लक्ष केले जात आहे. यांचाच अर्थ गुन्हेगार आणि सदरील दोन्ही अधिकाऱ्याचे आर्थिक हित संबंध दिसुन येतात. यामुळे शहरातील तरुणाचे भविष्ण अंधारात जात
असून संपुर्ण शहर नशीली पदार्थाच्या अधिन झाल्याचे दिसुन येत असून सापडलेल्या ड्रग गुन्हेगाऱ्यांची चौकशी होत अससून ही चौकशी निपक्षपाती व सखोल, संपूर्ण ड्रग व्यवसाय बंद करणारी पोलीस यंत्रनेकडुन होऊ शकत नाही व यामुळे या व्यवसायाचे मुळ सुत्रधार हे बाजुलाच राहत असून, जुजबी कारवाई होत असून यामुळे शहर वासीयांना या पोलीस यंत्रनेवरती विश्वास राहीला नाही, या गुन्हयाची चौकशी व मुळ आरोपी शोधुन काढण्यासाठी ही चौकशी शासनाच्या सक्षम यंत्रनेकडे सोपवुन ड्रग व्यवसायीकांची पाळेमुळे खनुन हा व्यवसाय संपुर्ण नष्ट व्हावा. अशी शहर वासीयांची मागणी आहे. तुळजापूरचे डी.वाय.एस.पी. निलेश देशमुख पोलीस स्टेशन निरीक्षक रविंद्र खांडेकर यांचे वरती शहर वासीयांचा विश्वास राहीलेला नसुन त्यांच्याकडून नागरीक व भक्तांना न्याय मिळु शकत नाही. अश्या भ्रष्ट अधिकाऱ्याची त्वरीत बदली करावी नसता येणाऱ्या काळात अश्या अधिकाऱ्याच्या विरोधात तिव्र आंदोलन शहरवासीयांनकडून केले जाईल.
याची नोंद घेवुन तुळजापूर नागरीक व देविभक्तांना या प्रकरणी न्याय मिळावा व शासनाची होणारी बदनामी थांबवावी निवेदन देताना शिवसेनेचे अमोल जाधव,शाम पवार, तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष, तसेच पुजारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.