तुळजापूर ड्रग्स प्रकरणी दुर्गेश पवार यांना न्यायालयकडून अटकपूर्व जामीन मंजूर
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील सेवन गटातील आरोपी असलेले दुर्गेश पवार यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असून या प्रकरणात आतापर्यंत हा सहाजनाच्या जामीन मंजूर झाला आहे .
आतापर्यंत या प्रकरणात एकूण ३८ संशयित आरोपी निष्पन्न झाले असून त्यामध्ये २२ जणांना अटक झाली आहे तर १० जण अद्यापही फरार आहेत यामध्ये विनोद गंगणे,आलोक शिंदे व उदय शेटे व इतर दोन अश्याच्या अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता यानंतर या प्रकरणात असलेले सेवन गटातील संशयित आरोपी दुर्गेश पवार यांना जामीन मंजूर झाला असून त्यामुळे त्यांच्या समर्थकात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दुर्गेश पवार यांच्यावतीने ॲड संजय पवार तुळजापूर यांनी बाजु मांडली त्यानंतर जामीन मंजुर करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ॲड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.