महिलांनी पालकमंत्र्यांना यात्रा मैदानची जागा मोकळी करण्याचं दिले निवेदन..
पालकमंत्र्यांनी तात्काळ लगेच आदेश दिले…
तुळजापूर : प्रतिनिधी
तिर्थ क्षेत्र आई तुळजाभवानीच्या पावन पवित्र नगरीत यात्रा मैदानासाठी आरक्षित सात एकर जागा… आणि त्या जागेचा खेळखंडोबा ! १९८९ साली शासनाने ही जागा यात्रा मैदानासाठी राखीव ठेवली,१२ लाख मंजूर केले,३.४८ लाख भरपाई दिली. पण पुढे काय? सत्तेच्या खुर्चीवर बसताच ठराव बदलला, फेरफार गायब झाले आणि डुप्लिकेट पीआर कार्ड तयार झालं! पदाचा सुवर्णसंधी साधत एका माजी नगराध्यक्षाने शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन हडपण्याचा मास्टर प्लॅन राबवला. परिणामी, सात एकर जागेपैकी फक्त तीन एकर मोकळी, बाकीच्या जागेवर उभ्या आहेत बिल्डिंग मोठ्या प्रमाणावर इमारती ! हे सर्व बघून नागरिक चिडले, रस्त्यावर उतरले, उपोषण सुरू केलं. पण सत्ता आणि प्रशासन बहिरे झाले की काय? बुधवारी पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव दौऱ्यावर आले. परिवहन मंत्री असल्याने त्यांनी सोलापूर ते धाराशिव एसटी प्रवास करून बेक्कार व्यवस्थेचा अनुभव घेतला. त्यांचं वाहन तुळजापुरात पोहोचताच काही कमानवेस येथील महिलांनी त्यांना यात्रा मैदानची जागा मोकळी करण्याचं पालकमंत्र्यांना दिलेली निवेदन दिलं.यावेळी मोठ्या प्रमाणात महिला निवेदन देताना उपस्थित होत्या.