कर्णकर्कश आवाज आणि फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या बुलेटवर पोलिसांची कारवाई होणार का ?

कर्णकर्कश आवाज आणि फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या बुलेटवर पोलिसांची कारवाई होणार का ?

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर शहरात बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाच्या व फॅन्सी नंबर प्लेट आणि फटाका फोडणाऱ्या बुलेट गाड्यावर पोलिस निरीक्षकानी कारवाईत करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्या जप्त कराव्यात शहरातील नागरिकातून मागणी होत आहे.

शहरात गल्ली बोळातील रस्त्यावर बुलेट शौकीन चालकांनी मूळ गाड्यांमध्ये बदल करुन कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून शहरांमध्ये उच्छाद मांडला आहे. तुळजापूर शहरातील रस्त्यावर अशा कर्णकर्कश आवाजाच्या बुलेट गाड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.त्यामुळे रस्त्यावरील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अनेकदा अशा गाड्यातून फटाक्याचे आवाज निघत असल्यामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रसंगी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता यत नाही. या गंभीर प्रकाराची दखल पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर व त्यांची टिम दखल घेणार का ?

मुळ बुलेट गाड्यांच्या सायलेन्सरमध्ये बदल (मॉडिफिकेशन) करुन आवाज करणारे सायलेन्सर असणारे सदर गाड्याना लावण्यात आले आहेत. ज्यामुळे रस्त्यावर या गाड्या कर्णकर्कश आवाज करीत धावत असतात. त्यामुळे वृद्ध नागरिक, लहान मुले यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन शहर शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांचे पथक पोलिसांच्या मदतीने या गाड्यावर कारवाईची धडक मोहीम राबविनार का ? असा सवाल शहरातील नागरिकातून विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!