ड्रग्स कार्टेल मुळे शहराची कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह  

ड्रग्स कार्टेल मुळे शहराची कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर शहर हे अलीकडच्या काळात ड्रग्स तस्करिसाठी कुप्रसिद्ध होत असुन, शहरात अवैध धंदे बोकाळले असुन पोलीसांचा धाकच राहीला नसल्याने खुलेआम तस्करांची मनमानी चालु आहे शहरात अत्यंत घातक असे एमडी ड्रग्स चे कार्टेल पोलीसांच्या वरदहस्तामुळे निर्माण होऊन छुप्या परंतु खुलेआम पद्धतीने ड्रग्स विक्री जोमात सुरु आहे या ड्रग्स कार्टेल ने वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जे की फक्त मुंबईतच मिळतात असे घातक अमली पदार्थ शहरात विक्रीसाठी आणले आसुन पोलीसांनी मात्र बघ्याची भुमीका घेतल्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा फज्जा उडाला असुन शहराचा उडता पंजाब होत असुन उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचा धाक पोलीसांवर राहीला नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे‌. शहरात विक्रीसाठी फक्त अंमली पदार्थच येत नसुन त्यासोबतच अवैध पिस्तुल/शस्त्रेही विक्रीसाठी येत असुन तुळजापूर शहर हे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या सौजन्याने व पोलीस ठाणे तुळजापूर यांच्या वरदहस्तामुळे तस्करांचे माहेरघर म्हणून तुळजापूर शहर उदयास येत आहे. पोलीसांच्या नाकर्तेपणामुळे चक्क ड्रग्स चे फार मोठे कार्टेल निर्माण झाले असुन या ड्रग्सच्या विळख्यात तरुण, अल्पवयीन व तसेच काही नामवंत व प्रतिष्ठीत नागरीकही अडकले असुन याबाबत सुजाण नागरिक उघडपणे व्यक्त होत असताना दिसत आहेत. सदर ड्रग्स हे खुप महाग असुन त्यासाठी नशेबाज गुन्हेगारीकडे वळत असुन शहरात घरफोडी, चेन स्नॅचींग, भुरट्या चोर्या, दरोडा, घरफोडी वाढल्या असून शहराची कायदा सुव्यवस्था या ड्रग्स कार्टेल मुळे ढवळून निघाली असुन या ड्रग्स सेवनाने ने अनेक तरुण अपघातात मरण पावले तर अनेक तरुण आर्थिक विवंचनेत सापडुन आत्महत्या करत आहेत तर युवापीडी नशेच्या आहारी जाऊन मानसीक संतुलन ढासळल्याने वेड लागण्याच्या मार्गावर आहेत तर अनेक तरुण नशेसाठी लागणार्या पैशासाठी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असल्याचे दुर्दैवी चित्र सद्ध्या शहरभर दिसत असुन परवा तामलवाडी टोल नाक्यावर काही ड्रग्स तस्करांना पोलीसांनी पकडले परंतु ते तर या ड्रग्स कार्टेलचे खुप लहान प्यादे असुन खरा सुत्रधार/आका कोणीतरी वेगळाच असल्याची खमंग चर्चा शहरभर होत आहे. एकंदर तुळजापूर शहर हे अलीकडच्या काळात ड्रग्स व शस्त्र तस्करीसाठी प्रसिद्ध होत चालले आहे हे उपविभागीय पोलिस अधिकारी व तुळजापूर पोलीस ठाणे यांच्या वरदहस्तामुळे घडत असुन शहर म्हणजे मटका,गुटखा,व्याज बट्टा,एमडी ड्रग्स, वेश्याव्यवसाय, शस्त्रतस्करी इत्यादी अवैध धंद्याचे माहेरघर बनले असुन उपविभागीय पोलिस अधिकारी यांचा वचकच राहीला नसल्याची खंत नागरीक उघडपणे व्यक्त करत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी सदर प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून सदर ड्रग्स कार्टेलची पाळेमुळे खणून त्यांचा “आका” कोण याचा शोध लावतील अशी आशा शहरातील नागरिक लावुन आहेत. एकंदर शहराची परीस्थिती खुपचं बिकट बनली असून शहरातील काही शासकीय पडीक इमारती ह्या ड्रग्स सेवनाचा अड्डा बनल्या असुन दिवसाढवळ्या तरुणवर्ग शहरातील पडीक इमारतीत ड्रग्सच्या नशेची झिंग चढवताना अढळत असुन या ड्रग्स कार्टेलचे आका व सदर ड्रग्स चे सेवन करणारे यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे असुन शहराचा उडता पंजाब होण्यापासून वाचवण्यासाठी वरीष्ठ स्थरावरुंन प्रयत्न होणे गरजेचे असुन उपविभागीय पोलिस अधिकारी व शहर पोलीस ठाणे यांना या हायप्रोफाइल ड्रग्स कार्टेलचा काहीच ताळमेळ लागत नसल्यामुळे नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या वरीष्ठ स्थरावरुंन कारवाई करावी अशी मागणी शहरवासी करत आहेत तसेच तुळजापूर शहरातील काही समाजसेवक, पुजारी व शहरातील प्रतीष्ठीत नागरिकांनी काल पुजारी मंडळ येथे या ड्रग्स कार्टेल संदर्भात एक बैठक घेऊन सदर प्रकारावर चिंतन करुन ड्रग्स तस्करांना व नशेबाज तरुणांना व पोलीस प्रशासनाला सज्जड दम दिला आहे की नशेबाज तरुणांना नशा करताना पकडुन अंगभर चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल व पोलीस प्रशासनालाही सज्जड दम दिला आहे की सदर ड्रग्स कार्टेलची पाळेमुळे खणून काढुन दोषींवर जलद कारवाई करावी अन्यथा आम्ही कायदा हातात घेण्यास मागेपुढे पाहणार नाही असा इशारा पुजारी मंडळाचे इमारतीत झालेल्या बैठकीत देण्यात आला यावेळेस शहरातील नागरिकांनी या ड्रग्स तस्करी विषयी उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलीस ठाणे तुळजापूर यांना सर्वस्वी जबाबदार ठरवले असून शहरातील ड्रग्स कार्टेल, मटका, गुटखा, वेश्याव्यवसाय, शस्त्रतस्करी व शहरात होणाऱ्या चेन स्नॅचींग, भुरट्या चोर्या, जबरी दरोडे यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलीस ठाणे तुळजापूर यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई ची मागणी केली असुन शहरातील नागरीक पोलीस प्रशासनावर प्रचंड चिडुन असल्याचे स्पष्ट झाले असुन पोलीसांनी हप्तेखोरीसाठी तुळजापूर शहराचा उडता पंजाब केल्याचा आरोप पोलीस प्रशासनावर केला असुन पोलीस प्रशासन मात्र जणू काही घडलेच नाही अश्या थाटात वावरत आहेत परंतु या ड्रग्स कार्टेल विरोधात शहरात झालेल्या सर्वपक्षीय एकजुटीचा काय परीणाम पोलीस प्रशासनावर होतो का याबद्दल साशंकता पोलीसांच्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झाली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!