पुण्यातील स्पर्धा परीक्षा आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून संस्थेच्या मदतीने ५०० विद्यार्थ्यांना मिळणार पोषक आहार – चंद्रकांत पाटील
पुणे, १२ फेब्रुवारी : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या सेवेतही सदैव तत्पर असतात. सगळ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी ते पुढाकार घेतात. नुकताच त्यांनी पुण्यातील स्पर्धा परीक्षा आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लावला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने देशभरातून असंख्य विद्यार्थी शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी शहरात येत असतात. अनेक विद्यार्थी हे गरीब, अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील असतात. आपल्या आई-वडिलांवर खर्चाचा अतिरिक्त ताण पडू नये, म्हणून पोटाला चिमटे काढत शिक्षण घेत असल्याची बातमी मध्यंतरी निदर्शनास आली. अशा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केले पाहिजे, अशी खूणगाठ मनाशी बांधली असल्याचे पाटील यांनी म्हटले. त्यानुसार, यावर काम करणाऱ्या स्टुडंट्स हेल्पिंग हॅण्डच्या मुलांची भेट घेऊन, यासंदर्भात काय करता येऊ शकेल, याची सविस्तर माहिती घेतली.
या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी सर्व माहिती जाणून घेऊन लोकसहभागातून सध्या संस्थेच्या मदतीने ५०० विद्यार्थ्यांना पोषक आहार देण्याचे मान्य केले. त्यासंदर्भातील यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अतिशय समाधान मिळाले, असेही पाटील यांनी म्हटले.