उपाधीक्षक भूमि अभिलेख तुळजापूर कार्यालयाचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर ?
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तिर्थ क्षेत्र तुळजापूर येथील उपाधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय येथील गैरकारभाराचा चव्हाट्यावर ? अधिकारी वर्ग मुख्यालयात न राहता मुख्यालयात राहत असल्याचे दाखवत शासनाची दिशाभुल करीत घर भाडे वसूल करीत असून संबंधित प्रकाराला अधिकाऱ्यांचे अभय असल्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने दि.१६ फेब्रुवारी पर्यंत कारवाई करा ? अन्यथा दि.१७ फेब्रुवारी जिल्हा अधीक्षक सह उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथील अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून आंदोलन करणार जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी जिल्हाधिकारी,जिल्हा अधीक्षक,उपाधीक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का ?
जिल्हा अधीक्षक व उपाधीक्षक यांचे अधिकाऱ्यांना अभय एखादी संघटना भ्रष्ट कारभाराचे पुरावे देऊन पण जाणीवपूर्वक दुर्लक्ष का अधिकारी वर्गाकडून केले जात आहे .काही अधिकाऱ्यांकडून चिरीमिरी देऊन वरिष्ठांकडून हा प्रकार थांबवला जात आहे का ? असा प्रश्न निर्माण होत असून जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी आंदोलनाचा इशारा देताच अधिकारी जागे होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे .