उमरगा पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी संवेदनशील गुन्हयातील आरोपी सात दिवसात मुसक्या आवळल्या
पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले,उमरगा
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
दि.२८ जानेवारी रोजी फिर्यादी शोभा काशिनाथ वडदरे वय ४५ वर्ष व्यवसाय घरकाम, रा. कराळी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी पो.स्टे. हजर येवुन फिर्याद जबाब दिला की, दि.२७ जानेवारी रोजी रात्री ०९:०० वा जन्याच्यासुमारास अमोल भरत जाधव व नागराज बापु जमादार दोघे रा. कराळी ता. उमरगा या दोघांनी मिळुन हातात तलवार व हंटर घेवुन श्री. सद्गुरू आगजाप्पा महाराज मंदिरात जावुन मंदिरात असलेल्या अल्पवयीन मुलगा आदित्य मंगेश वैष्णव व गौरव लक्ष्मण कदम यांचे गळयास तलवार लावुन जिवे मारण्याची धमकी देवुन आदित्य वैष्णव यास अमोल जमादार व नागराज जमादार यांनी खाली पाडुन छातीवर बसुन गळा दाबुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच लाऊड स्पिकरवरून गावकऱ्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देवुन मंदिराचे लोखंडी दरवाजा व आतील सामानाचे नासधूस केली. तसेच मठाधिपती तेजनाथ महाराज यांनापण फोनवर शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्याद वरून पो.स्टे. उमरगा गु.र.नं. ४२/२०२५ कलम१०९,११५ (२),३५२,३५१ (२). ३ (५) भा.न्या.सं. सहकलन ४/२५ शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, स पोलीस निरीक्षक कन्हेरे, पोउपनि पुजरवाड, पोहेकॉ /१४७० कोनगुलवार, पोना /११८१ कावळे, पोना / १६१३ सय्यद, पोकॉ/ १५३५ भोरे यांनी कराळी पाटी तसेच तलमोड ते सोलापुर रोडवरील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. अत्यंत सचोटीने व कौशल्यपुर्वक सर्व ठिकाणचे CCTV फुटेज पाहणी करून गुन्हयातील आरोपी नामे अमोल भरत जमादार, नागराज बापु जमादार यांचा त्याचे राहते घरी, कराळी, मुळज, तलमोड, धाकटीवाडी, थोरलीवाडी, हंद्राळ, कंटेकुर, कर्नाटकातील मनाळी, बसवकल्याण या ठिकाणी जावुन शोध घेतला तसेच आरोपींचे मोबाईल नंबरचे सीडीआर टॉवर लोकेशनची माहीती घेतली असता आरोपीबाबत कांहीएक माहीती मिळाली नाही. आम्ही सर्वतोपरीने / कसूनशोध घेत होते. आरोपींचे मोबाईल बंद असल्यामुळे त्यांचे निश्चित लोकेशन मिळत नव्हते. गुन्हयातील आरोपीनी कराळी येथील आगजप्पा मंदिरात शिकण्यासाठी असलेले अल्पवयीन मुलावर हल्ला केलेला असल्याने व आरोपी हे मिळुन येत नसल्याने कराळी गावकरी हे संतप्त झाले होते. ते आंदोलनाचे तयारीत होते. सदर प्रकरणावरून हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने आम्ही रात्रं दिवस हरत-हेने आरोपीतांचा शोध घेत असताना दि. ६/२/२९२५ रोजी सदर गुप्त माहिती मिळाली की, गुन्हयातील आरोपी हे आळंद तालुक्यातील व्हनाळी या गावात आहेत व ते संध्याकाळी दुसरीकडे जाणार आहेत अशी माहिती मिळाली. तेंव्हा मिळालेली संधी न दवडता तात्काळ व्हनाळी येथे जावुन आरोपी अमोल भरत जमादार वय ३० वर्षे व नागराज बापु जमादार वय २१ वर्षे दोघे रा. कराळी ता. उमरगा यांना ताब्यात घेवुन पोलिस ठाणे उमरगा येथे आणुन अटक करून त्यांना मा. न्यायालय उमरगा येथे हजर करून त्यांची दि.११/०२/२०२५ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड घेतली असुन कस्टडीमध्ये आरोपीकडुन गुन्हयात वापरलेली हत्यार तलवार व इंटर जप्त करण्यात आली आहे. सध्या आरोपीं हे दि.११/०२/२०२५ पावेतो पीसीआर मध्ये आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक धाराशिव संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन व उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उमरगा येथील पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सपोनि पांडुरंग कन्हेरे, पोउपनि गंगाधर पुजरवाड, पोहेकों /१४७० चैतन्य कोनगुलवार, पोना /१६१३ यासीन सय्यद, पोना/११८१ अनुरूद्र कावळे, पोकों/१५३५ नवनाथ भोरे यांनी केलेली आहे.