तुळजापूर शहर एन्ट्रीची लूट थांबली, त्या रात्री पण बनावट पावत्यांची वसुली
न.प.नी दोन इसम पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नगरपरिषदेच्या अधिकृत वाहनतळ ठेक्याचा कालावधी ८ फेब्रुवारी रोजी संपल्यानंतर, यंदा नगरपरिषदेकडून कोणतीही लूटसत्र राबवले गेले नाही. मात्र, काही महाठकांनी संधी साधत बनावट पावत्या छापून भाविक आणि वाहनचालकांची रात्रीच्या अंधारात लूट केली.नगरपरिषदेच्या अधिकृत वाहनतळ येथे दोन इस्मानी अनाधिकृतपणे बनावट नगरपालिकेच्या नावाने बिल बुक करून पावत्या पडल्या व रक्कम वसूल केल्या बद्ल नगर परिषद च्या कर्मचाऱ्यांनी दोन इस्मना ताब्यात घेऊन पोलीस प्रशासनाच्या हवाली केले होते. पोलीस प्रशासनाची कारवाई मात्र शून्य.
डमी आरोपी तयार केले रविंद्र साळुंके
नगरपरिषद तुळजापूर बनावट कार पार्किंग पावती देऊन वाहनधारकाकडून पैसे वसूल केले बद्दल नगरपालिकेचे कर्मचारी गायकवाड,पाठक कर्मचारी दोन इसम पुराव्यासह ताब्यात दिले होते तरी पोलिसांनी म्होरक्याचा तपास करून पोलिसांनी कारवाई करावी