साखर कारखान्याचे केमिकल मिश्रित पाणी सोडल्याने पाळीव दुधभाती जनावरे मृत्युमुखी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव तालुक्यातील केशेगाव परिसरातील ओढामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर लि. अरविंदनगर केशेगाव साखर कारखान्याकडुन केमिकल मिश्रणीत पाणी पाईपलाईनद्वारे सोडले जात आहे. यामुळे ओढ्यातील हजारो मासे, जलचर प्राणी मृत्यू पडत आहेत. शिवाय दुर्गंधी देखील पसरली आहे.
धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील नामांकित डॉ बाबासाहे आंबेडकर साखर कारखान्याचे केमिकल व मळी मिश्रित पाणी कारखान्याच्या पाठीमागच्या ओढ्यातून हे केमिकल व मळी मिश्रित पाणी सोडत होते. पण या गावातील लोकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. केमिकल व मळी मिश्रण पाणी ओढ्यात पाईपलाईनद्वारे व ट्रँकरने सोडले जात आहे. यामुळे हजारो मासे, जलचर प्राणी मृत पडलेले आहेत. यांच्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
करखान्यांकडून केमिकल व मळी मिश्रित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मासे इतर दुधभाती जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. त्याचबरोबर जमीन ही नापीक होत आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केशेगाव, विठ्ठलवाडी, शिंदेवाडी, उंबरेगव्हाण परिसरातील शेतकरी आणि गावकऱ्यांनी केला आहे. लवकरात लवकर कारवाई करावी नाही झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.