तुळजापूरच्या कारपार्किंग मध्ये उभ्या असलेल्या भाविकाच्या कारने अचानक घेतला पेट,
अन् ‘ते’ कार सर्व जळून खाक आणि बघता बघता आगीनं रौद्र रुप धारण केलं.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी तिर्थ क्षेत्रात दि.८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या दम्याण शहरात घाटशील रेड कार पार्किंग येथ स्विफ्ट डिझायर कारचा थरार पाहायला मिळाला.घाटशिर रोड परिसरातील असलेल्या कार पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर कारणे अचानक पेट घेतला आणि बघता बघता आगीनं रौद्र रुप धारण केलं.तात्काळ खाजगी पाणी सप्लायर कडून पोलिसांनी आग विझवण्यात यश आलं मात्र तोपर्यंत आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली होती.
गणेश पटाडे रा.निल गव्हाण तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या भाविक भक्तांची ही कार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी समोर आली आहे. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नसून तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अरुण शिरगिरे यांनी तात्काळ खाजगी पाण्याच्या टॅक्टरद्वारे विजविण्यास मदत मिळाल या प्रकरणाचा अधिक तपास तुळजापूर पोलिस करीत आहेत. गाडीचा जास्त प्रवास झाल्यामुळे गाडी गरम झाल्यामुळे भाविक गाडीच्या खाली उतरूण दर्शनासाठी गेले असता काळी वेळाने अचानक कारला आग लागली आहे.