तुळजापूर तालुक्याचे राज्य उत्पादन शुल्क विभाग फक्त नावालाच;तुळजापूर पोलिसांनी सत्तावीस हजाराचीदारू केली जप्त

तुळजापूर तालुक्याचे राज्य उत्पादन शुल्क विभाग फक्त नावालाच;तुळजापूर पोलिसांनी सत्तावीस हजाराचीदारू केली जप्त

तुळजापूर तालुक्याचे राज्य उत्पादन शुल्क विभाग दारू दुकानदारावर काय करणार कारवाई ?

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तालुक्यातील वडगाव लाख येथे दोनशे विदेशी बाटल्यांनसह मोटार सायकल वर एकुण २७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई बुधवार दि.५ रोजी राञी ०९.३० वा केली

तुळजापूर तालुक्याचे राज्य उत्पादन शुल्क विभाग नावालाच;तुळजापूर पोलिसांनी सत्तावीस हजार रुपयाची दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू दुकानाचा परवाना रद्द करून कारवाई करावी महिला वर्गातून मताणी

तुळजापूर तालुक्यात अवैध दारु विक्री प्रमाण वाढले आहे फक्त अवैध दारु विकणाऱ्यावर कारवाई केली मात्र तुळजापूर शहर ज्या दारू दुकानातुन ही दारु अवैध विक्री साठी बाहेर नेली जाते त्या परवाना धारक दुकानदारावर कारवाई करून त्या वाईन्स शॉव दुकानदाराचा परवाना रद्द करावा अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.
यात काही ग्रामीण भागातील कुटूंबाचे संसार उध्वस्त झाले आहेत.जबाबदार कोण ? अशा परवानधारक दुकानदारावर कारवाई करून परवाणा रद्द करावा. धनाजी दिगंबर जेटीथोर, वय ४६ वर्षे, रा. मंगरुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे बुधवार दि.०५ रोजी ०९.३० वाजण्याच्या सुमारास वडगाव लाख येथे अंदाजे २७००० हजार रुपयाच्या किंमतीची देशी विदेशी दारुच्या २०० बाटल्या सह मोटरसायकल अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी कामतकर, पोलिस वैभव देशमुख, पोलिस अमोल पवार व पोलीस चालक रोटे या टीमच्या सहाय्याने पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- ६५(ई) अन्वये तुळजापूर पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!